MPSC, UPSC व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त माहीती



युपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठी अनेक
पुस्तकं उपलब्ध आहेत. जाडजूड, मोठाली, सविस्तर
माहिती देणारी ही पुस्तकं असतात. पण
त्यांचा अभ्यास करताना काही गोष्टी डोक्यात
ठेवल्या पाहिजेत.

स्पर्धा परीक्षांवर पुष्कळ माहिती उपलब्ध
आहे. वेबसाइट्स, पुस्तकं, मासिकं, सीडीज
यांसारख्या अनेक माध्यमांतून माहिती मिळत
असते. पण माहितीचे जेवढे स्रोत जास्त असतात
तेवढीच कन्फ्युजन होण्याची शक्यताही जास्त
असते. त्यामुळे सगळी पुस्तकं
थोडी थोडी वाचण्यापेक्षा एकच पुस्तक
खूपदा वाचा. कारण पुस्तक कुठलंही असो पहिलं
महायुद्ध सगळीकडेच एकसारखं असणार आहे.

 एखाद्या विषयावर सविस्तर
माहिती पुस्तकात असते. समजा १२० पानं
त्या विषयाच्या धड्यावर असतील तर
त्यातली मोजकीच ४०-४५ पानं लक्षपूर्वक
वाचावीत. महत्त्वाच्या मुद्यांवर खूण करून
ठेवावी. एकदा दोनदा नव्हे तर डोक्यात पक्कं
होईपर्यंत वाचा. पण कृपया घोकंपट्टी करू नका.

 मुद्दे वाचून झाल्यावर शांत डोक्याने विचार
करावा. स्वत:च स्वत:शी त्या मुद्यांवर चर्चा करावी.
एखादी घटना घडली नसती किंवा दुसऱ्या पद्धत
घडली असती तर त्याचे परिणाम काय झाले
असते? यासारखे प्रश्न स्वत:लाच विचारावेत.
मात्र असं करत असताना त्या विषयाशीच
चिकटून रहावं.

विचारविनिमय सुरू असतानाच दुसरीकडे
नोट्स काढाव्यात. 
नोट्स लिहिणं म्हणजे
पुस्तकातलं जसंच्या तसं लिहिणं नाही.
त्या विषयाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहून
काढावा. संपूर्ण नोट्स लिहून झाल्यावर
पुन्हा एकदा वाचाव्यात. त्यामुळे रिविजन
करताना पुन्हा पुस्तक
वाचण्यापेक्षा त्या नोट्सवरून नजर फिरवणं
सोयीस्कर जातं.

इतर काही मुद्दे

या परीक्षांची १२ वी नंतर तयारी सुरु
केल्यास उत्तम.

पदवीनंतरही तयारी होऊ शकते

स्वत: अभ्यास करण्याबरोबरच योग्य
मार्गदर्शक निवडा. कारण मार्गदर्शनाशिवाय
ट्रॅक चुकण्याची शक्यता असते.

परीक्षा देण्याच्या एक ते दीड वर्ष
आधी अभ्यास सुरू करा.

आधी मेन्स मग प्रिलीम अशा क्रमाने अभ्यास करा.

प्रिलिमच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यास
९० दिवस पुरेसे आहेत.

विषय निवडताना विषयाची आवड, गोडी,
उपलब्ध साहित्य आणि मार्गदर्शन लक्षात
घ्यावं.

अभ्यासासाठी विविध विषयांची पुस्तकं,
नियमित वृत्तपत्रं वाचावीत आणि त्यावर
डिस्कशन करावीत.

१० वर्षांपासूनचे पेपर बघावेत. जेणेकरून
परीक्षेचा अंदाज येतो.


गाइड, मासिकं - क्रोनिकल, विझार्ड, सीएसआर,
दर्पण, स्पर्धा परीक्षा , चाणक्य मंडळ,
लोकराज्य

पुस्तकं - के सागर, दत्ता सांगलोकर, दांडेकर
आदींची पुस्तकं

साभार : Spardha Vishwa


वाचा


अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.

१ कधीही फार तास सलग अभ्यासाला बसूनका. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.

२ अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची ...मदतच होईल.

३ अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.

४ एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झालं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा. ती गोष्ट, धडा, मॅथ्स नंतर करायचं आहे हे लक्षात ठेवा.

५ फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

६ वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडाचाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.

७ वीकेण्डला स्वतःची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.

८ अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.

९ दहावीला असलेल्या विद्याथ्र्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अ‍ॅप्टिट्युड टेस्टकरून घ्यायला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडणं सोपं जाईल.

१०. बारावीला गेलेल्या विद्याथ्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेहीलक्ष ठेवायला हवं.

११ तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करिअर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला हवी. खासगी नोकरी करायची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. 


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 19 जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उपनियोजक (8 जागा), सहायक पणन व्यवस्थापक (1 जागा), उपलेखापाल (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे.

या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागा


भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागांसाठी भरती
Click On The Advt To See Full Size


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०१३



General Insurance Corporation of India- Officers Scale I (Asst Managers) Exam Call Letter
अधिक माहिती http://gic.eadmissions.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिका?/
री- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये ९४ जागा


गडचिरोली जिल्हा परिषद आस्थापनेवर कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी १ जागा, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (महिला) २० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ जागा, पशुधन पर्यवेक्षक ५ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा, लघुलेखक (उ.श्रे) १ जागा, कनिष्ठ लेखा १ जागा, परिचर २३ जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३ आहे.


एम.पी.एस.सी.उमेदवारांसाठी महत्वाची माहीती

राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे २०१३ रोजी; प्रवेशपत्र (Hall Tickets) उपलब्ध 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ १८ मे २०१३ रोजी घेण्यात येणार असून सदर परिक्षेचे प्रवेशपत्र आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारानी प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत.



एम.पी.एस.सी. लिपिक- टंकलेखक (इंग्रजी व मराठी) परीक्षा २०१३ च्या उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी लिपिक- टंकलेखक परीक्षा (इंग्रजी व मराठी) २ जून २०१३ रोजी घेण्यात येणार आहे परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल त्वरित अपडेट करावी. मात्र निवडण्यात आलेले केंद्र बदलू नये असे आयोगाने जाहीर केले आहे.