अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.
१ कधीही फार तास सलग अभ्यासाला बसूनका. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.
२ अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची ...मदतच होईल.
३ अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.
४ एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झालं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा. ती गोष्ट, धडा, मॅथ्स नंतर करायचं आहे हे लक्षात ठेवा.
५ फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.
६ वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडाचाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.
७ वीकेण्डला स्वतःची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.
८ अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.
९ दहावीला असलेल्या विद्याथ्र्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अॅप्टिट्युड टेस्टकरून घ्यायला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडणं सोपं जाईल.
१०. बारावीला गेलेल्या विद्याथ्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेहीलक्ष ठेवायला हवं.
११ तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करिअर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला हवी. खासगी नोकरी करायची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं.